नव कृष्णा व्हॅली स्कूलचा इ.10 वी च्या सी बी एस ई परीक्षेचा 100 % निकाल.नव कृष्णा व्हॅली स्कूल कुपवाड इयत्ता दहावीचा सीबीएसई परीक्षेचा निकाल 100% लागला असून विद्यार्थ्यांनी परिक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. कु. सिद्धार्थ राजेश शहा याने 97.60% टक्के गुण संपादन केले. व समाजशास्त्र व हिंदी 100 पैकी 100 मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. कु.आर्यन मितेश शहा याने 96. 20 % मिळवत द्वितीय क्रमांक पटकावलाअसून गणित व समाजशास्त्र विषयात 100 पैकी 100 गुण मिळवले आहेत. कु. युवराज सुखदेवसिंग भाटी यांस 95. 40% टक्के गुण मिळाले असून माहिती तंत्रज्ञान या विषयांत 100 पैकी 100 गुण मिळावीत तृतीय क्रमांक पटकावला.कु.पलक विहंग शहा हिने 95.2% व कु.वेदिक वेंकटेश इरळे हिने 94.2 %टक्के गुण मिळवले. त्याचबरोबर कु.अंजली अनिल कोलप या विद्यार्थ्यांनीने हिंदी विषयात 100 पैकी 100 गुण मिळवलेले आहेत.या शैक्षणिक वर्षात शाळेचा निकाल शंभर टक्के असून एकूण 9 विद्यार्थ्यांना 90 टक्क्यापेक्षा अधिक गुण मिळवलेआहेत. याबद्दल शाळेचे संस्थापक माननीय प्रवीण शेठ लुंकड तसेच सचिव एन जी कामत , प्रियंका चव्हाण यांनी विद्यार्थ्यांचे विशेष अभिनंदन केले. सदर विद्यार्थ्यांना नवकृष्णा व्हॅली स्कूल प्राचार्या संगीता पागनीस, उपप्राचार्य प्रशांत चव्हाण व इयत्ता दहावीचा विद्यार्थ्यांसाठी अथक परिश्रम घेणाऱ्या शिक्षकांचे मार्गदर्शन प्रोत्साहन मिळाले.